नांदेड दि.१५ – लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. ही घटना मुखेड तालुक्यात घडली असून यामध्ये एकून 37 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
उदगीर (जि. लातुर) तालुक्यातील हाळी गावातील लग्नाचे हे वऱ्हाड बिलोली तालुक्यात जात होते. यावेळी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आल्यानंतर भरधाव वेगात असणारा हा ट्रक एका वळणावर आला. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकचा मोठा अपघात झाला. या अपघातात एकूण 37 जण जखमी झाले असून एक जण जागीच ठार झाला आहे. तर जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्व जखमींपैकी 33 जणांवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रकमधील एकूण 37 जण जखमी झालेयत. या 37 जखमीपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर असलेल्या या रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे. जखमींत 29 महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे.