केज दि.१६ – तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार अक्षय गीते यांनी केली आहे.
कोरोना सारख्या महामारी मध्ये त्रस्त झालेला शेतकरी शेतीमालाला नसलेला भाव आणि त्यानंतर कृषी विभागाकडून बी बियाणे उपलब्ध नाही असे उत्तर देण्यात येत आहे. तसेच ड्रॉ काढून ऑनलाइन पद्धतीने यादी डिक्लेअर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना काळामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज कधी मागवले ? आणि यादी फायनल कधी केली ? हे शेतकऱ्यांना माहीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अक्षय गीते, संपत गुंड ,जहीर शेख व शेतकरी उपस्थित होते.