Site icon सक्रिय न्यूज

कळंब शहरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…..!

कळंब शहरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…..!
कळंब दि.15 – शहरातील इंदिरा नगर भागात धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी तब्बल सव्वा लाखांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे शहरातील गुटखा माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
                 स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बतमीदारकडून शहरातील इंदिरा नगर भागात मोठयप्रमानात अवैधरित्या गुटखा साठा ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. सदर माहितीवरून पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन, स्था.गु. शाखेचे पोलीस निरीक्षक घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम कळंबकडे रवाना झाली. संबंधित ठिकाणी छापा मारला असता सुनिल हरिदास क्षीरसागर वय-27 वर्षे रा. इंदिरा नगर, याच्याकडुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू असा एकूण 1,30,386 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलीस नाईक ए. जी. चव्हाण यांनी दिली.
                 दरम्यान आरोपी सुनील क्षीरसागर याला ताब्यात घेतले असून गुटख्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कळंब शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. सदरील कारवाई पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग माने, पोलीस नाईक सय्यद , पोलीस नाईक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल जाधवर, कॉन्स्टेबल आरसेवाड, मरलापल्ले, होळकर, माने यांनी केली आहे.
शेअर करा
Exit mobile version