Site icon सक्रिय न्यूज

नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा……!

नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचा स्वबळाचा नारा……!
बीड दि.१५ – कोरोनाच्या संकटात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होणार याबद्दल आणखी तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु पक्षांतर्गत हालचाल सुरू झाली असून निवडणुकीची मोर्चे बांधणी दिसून येत आहे.आणि याचाच एक भाग म्हणून केज व वडवणी नगरपंचायत निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
              शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्कप्रमुख मा.खा. चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत केज नगर पंचायत निवडणूक संदर्भात दि. 16 जुन 2021 रोजी शिक्षक पतपेढी येथे शिवसेनेची महत्व पूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक हे होते.  सदरील बैठकीत केज नगर पंचायत निवडणूकी संदर्भात प्रभाग निहाय बांधणी व घरोघरी शिवसेनेचे विचार  पोहोचवने तसेच कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची शिदोरी घेऊन पदाधिकाऱ्यांनी नगर पंचायत निवडणुकीत बांधणी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच केज शहरासाठी व नगर पंचायत साठी नगर विकास मंत्रालयाकडून लागणारा निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन खैरे यांनी दिले.
                     यावेळी महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख रत्नमाला मुंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशिल पिंगळे, जिल्हा संघटक योगेश नवले,  गौतम वैराळे, तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, शहर प्रमुख अनिल बडे, वडवणी ता  प्र. संदिप माने, नागेश डिगे, विनायक मुळे, माऊली गोंडे, प्रमिला माळी,  युवासेना ता. प्रमुख अरविंद थोरात यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
शेअर करा
Exit mobile version