केज दि.१८ – शहरातील बाजारात भाजीपाला खरेदी करणाऱ्या तरुणाच्या खिशातून २० हजार रुपयांचा मोबाईल, दोन हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा केजच्या शुक्रवार च्या बाजारातून एका शिक्षकाचा मोबाईल चोरीची घटना घडल्याने केज शहरात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे.
केज शहरात मंगळवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातून अश्फाक नवाब सय्यद यांचा 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी गेला होता. मात्र त्याचा सुगावा लागण्या अगोदरच पुन्हा आज शुक्रवार च्या बाजारातुन एकाचा मोबाईल चोरी झाला आहे. नितीन लोकरे नावाचे शिक्षक दि.१८ रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या मैदानावर भरलेल्या बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले असता खिशातून त्यांचा 15000 रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाला आहे.
दरम्यान आठ दिवसांच्या अंतरानेच केज शहरातून मोबाईल चोरीच्या तीन घटना घडल्याचे निदर्शनास आल्याने केज शहरात मोबाईल चोरांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत असले तरी पोलिसांना मात्र अद्याप एकाही घटनेचा सुगावा लागलेला नसून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.