Site icon सक्रिय न्यूज

पत्नीच्या निधनानंतर अवघ्या पाच दिवसांत ‘या’ महान खेळाडूचे निधन……!

पत्नीच्या निधनानंतर अवघ्या पाच दिवसांत ‘या’ महान खेळाडूचे निधन……!

????????????????????????????????????

नवी दिल्ली दि.१९ – भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिल्खासिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं  हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

दरम्यान, मिल्खासिंग यांच्या जीवनावर ‘भाग मिल्खा भाग’ या नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला आहे.

शेअर करा
Exit mobile version