Site icon सक्रिय न्यूज

लाठी हल्ल्याचा केजमध्ये निषेध……!

लाठी हल्ल्याचा केजमध्ये निषेध……!

केज दि.१९ – बीड येथे उपमुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कोव्हीड कर्मचाऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा केज येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.

                  दि. १८ रोजी बीड येथे आढावा बैठकीसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध मागण्यां संदर्भात भेटण्यासाठी गेलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. त्या घटनेचा केज येथील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.निवेदनात कोरोना सारख्या कठीण वेळेत त्यांनी केलेली रुग्ण सेवा याचा विचार करून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.                                                         निवेदनावर डॉ.श्रीमती सोनवणे , सचिन शिंदे, गणेश काळे, राजाभाऊ भोसले, शिवराज मुथळे, राज ढाकने, हजारे, वंदना भोसले, ऋषीकेश मुंडे, प्रविन सोळंके, रंजीत सोनवने, रोहीत धपाटे, आश्वीनी वाघमारे, स्वाती ठोंबरे, जय जोगदंड, आशोक गाडे, अतुल थोरात, विक्की हजारे, राहुल पटेकर, यासिन शेख, योगेश सिरसट, डोंगरे अशोक, रविंद्र पारखे, महावीर इंगळे, सुरक्षा रक्षक बालाजी मुंडे, माने मामा, संतोष लांडगे, विलास तौर, कृष्णा कराड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेअर करा
Exit mobile version