अंबाजोगाई दि.20 – केज विधानसभा मतदार संघात प्रदेशाकडून आलेले डॉ. शामा प्रसाद मुखर्जी यांचे कार्यक्रम 23 जून पासून मोठ्या प्रमाणावर हाती घेणार असल्याची माहिती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी दिली.
अभियान संयोजक तथा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आई निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते महादू मस्के डॉ. पाचेगावकर , वैजनाथ देशमुख कल्याणराव काळे , ॲड संतोष मुंडे प्रशांत आदनाक आनंदराव आरसुळे, अमोल पवार महेश आंबाड, दिगंबर चव्हाण गौरव लामतुरे व इतर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळी प्रास्ताविकात करतांना डॉ. पाचेगावकर यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला. सविस्तर मार्गदर्शन करताना राम कुलकर्णी म्हणाले डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचं आधुनिक भारताच्या उभारणीत फार मोठे योगदान आहे. राष्ट्रभक्ती आणि त्याग याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी .23 रोजी बलिदान दिवस असून त्या दिवशी व्याख्यान वृक्षारोपण स्वच्छता मोहीम प्लास्टिक मुक्ती आधी कार्यक्रम घेतले जावेत.
तसेच 25 जून रोजी काळा दिवस कार्यकर्त्यांनी पाळावा, याच दिवशी देशात स्वर्गीय इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती. मिसा खाली तत्कालीन काळात अटक असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. शिवाय 27 जून रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम कशा प्रकारे यशस्वी केला पाहिजे याशिवाय इतर सेवाभावी कार्यक्रम आपल्या कार्यकर्त्यांनी करून घ्यावेत असं सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी केलं .