मुंबई दि.२१ – बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. भारतातील आघाडीची एक बँक म्हणजेच बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टेंट, अटेंडर, चौकीदार आणि माळी या पदांसाठी बंपर भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत bankofindia.co.in वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. मात्र, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 जून, 2021 आहे.
बँक ऑफ इंडियाच्या असिस्टेंट, अटेंडर, चौकीदार आणि माळी या पदासाठी उमेदवार 30 जूनपर्यंत अर्ज करु शकतात. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी bankofindia.co.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑफलाइन पध्दतीने देखील भरू शकतात. त्यासाठी संलग्न केलेला फॉर्म अधिसूचनेसह भरावा आणि भरलेला फॉर्म पोस्टाद्वारे दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.यामधे असिस्टेंट, अटेंडर, चौकीदार आणि माळी यासर्व पदांसाठी पात्रता वेगवेगळी आहे. उमेदवाराचं वय हे त्याच्या पदांवरून ठरवण्यात आले आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण वेबसाईटवरून घ्यावी. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधून होणार आहे. तर ऑफिस असिस्टेंट पदासाठी दरमहा 15,000 रूपये,अटेंडरसाठी दरमहा 8,000 रूपये, चौकीदार आणि माळी पदांसाठी दरमहा 5,000 रूपये निश्चित करण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 350 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 350 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 2 जुलैपासून सुरु होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार नाविक (जनरल ड्युटी) नाविक (डोमेस्टिक ब्रँच), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल) आणि यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) या पदांसाठी भरती होणार आहे.