Site icon सक्रिय न्यूज

पहा आजची तालुकानिहाय कोरोनाची आकडेवारी…….!

पहा आजची तालुकानिहाय कोरोनाची आकडेवारी…….!
बीड जिल्ह्यात आज 147 तर केज   11….!
बीड दि. 22 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 2997 कोरोना अहवालात जिल्ह्यात 147 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 11 रुग्णांचा समावेश आहे.
         जिल्ह्यात अंबाजोगाई 12, आष्टी 29, बीड 31, धारूर 06,  गेवराई 13, केज 11, माजलगाव 07, परळी 03 पाटोदा 14, शिरूर 15, वडवणी 06 असे रुग्ण आढळून आले आहेत.

केज उपजिल्हा रुग्णालयात 18 वर्षांपासून पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू……..!

केज दि.२२ – २१ जून पासून 18 वर्षा पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याचे निश्चित करण्यात आल्यानुसार शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सदरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ.संजय राऊत यांनी दिली.
           शासनाने ठरवल्या प्रमाणे 18 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. सदरील वयोगटातील नागरिकांनी शक्यतो ऑनलाइन नोंदणी करून लसीकरणास यावे. परंतु ज्यांना ऑनलाइन नोंदणी करणे शक्य नाही अशा नागरिकांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र जास्त गर्दी होऊ नये व वाट पाहत बसावे लागू नये म्हणून ऑनलाइन नोंदणी करण्याचे व जास्तीतजास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version