Site icon सक्रिय न्यूज

केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांचा विनयभंग 

केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांचा विनयभंग 
केज दि.२२ –  एका ३२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून दोघा बापलेकांनी तिचा विनयभंग करून मारहाण केली. तर दुसऱ्या घटनेत शेतात औत हाणण्यावरून एका ४० वर्षीय महिलेस व तिच्या मुलास तिघा बापलेकांनी मारहाण करून विनयभंग केला. या दोन्ही घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
                     केज तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय महिला ही २१ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या घरी असताना सचिन रामभाऊ मोळे, रामभाऊ बाबु मोळे ( दोन्ही रा. हनुमंत पिपरी ता. केज ) या दोघा बापलेकांनी घरात घुसून तुझा नवरा कुठे आहे ? अशी विचारणा केली. सचिन मोळे याने महिलेच्या रूममध्ये जाऊन केस धरून विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा करताच रामभाऊ मोळे यांनी महिलेचे तोंड दाबून कपडे फाडत मारहाण केली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून सचिन मोळे व रामभाऊ मोळे या दोघा बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.
              तर दुसऱ्या घटनेत ४० वर्षीय पीडित महिला व तिचा मुलगा हे दोघे २१ जून रोजी दुपारी २ वाजता शेतात औत हाणत असताना सर्जेराव बाबासाहेब कोल्हे ( रा. कोल्हेवस्ती ता. केज ) याने शेतात येऊन पीडित महिलेच्या मुलास औतावरून ढकलून देत शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी पीडित महिला धावत आली असता सर्जेराव याने तिचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. तर कृष्णा बाबासाहेब कोल्हे व बाबासाहेब दगडोबा कोल्हे यांनी ही पीडित महिलेच्या मुलास शिवीगाळ व मारहाण करीत मुक्कामार दिला. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून सर्जेराव कोल्हे, कृष्णा कोल्हे, बाबासाहेब कोल्हे या तिघा बापलेकांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version