Site icon सक्रिय न्यूज

दुचाकीच्या धडकेत दोघे भाऊ जखमी, केज पोलिसांत गुन्हा दाखल……! 

दुचाकीच्या धडकेत दोघे भाऊ जखमी, केज पोलिसांत गुन्हा दाखल……! 
केज दि.२४ – भरधाव दुचाकीने दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना केज – नांदूरघाट रस्त्यावरील नाव्होलीजवळ घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
         केज तालुक्यातील साळेगाव येथील भागवत मोहन तिडके व श्रीराम मोहन तिडके हे दोघे भाऊ १९ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवर (एम. एच. ११ बी. एम. ००३९ ) बसून नांदूरघाटकडून गावाकडे निघाले होते. त्यांची दुचाकी नाव्होली शिवारातील जय मल्हार हॉटेलसमोर आली असता केजकडून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने ( एम. एच. १३ बी. ए. १०६७ ) त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात श्रीराम तिडके हे गंभीर तर भागवत तिडके हे किरकोळ जखमी झाले. भागवत तिडके यांच्या फिर्यादीवरून ( एम. एच. १३ बी. ए. १०६७ ) या क्रमांकाच्या दुचाकी चालकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार मुकुंद ढाकणे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version