केज दि.२५ – तालुक्यातील केवड येथील रहिवासी असलेला एक पंधरा वर्षीय मुलगा दि.25 रोजी पहाटे 4.30 वाजता लघुशंकेला बाहेर पडला तो पुन्हा घरात परत आला नसल्याची घटना घडली असून त्याचा सर्वत्र शोध सुरू आहे.
रोहीत(टिल्या) विजयकुमार सपाटे वय १५ असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. तो पहाटे लघुशंकेला म्हणून घराच्या बाहेर आला. मात्र पुन्हा तो परत घरात आलाच नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला असून सदरील मुलगा कुणाला आढळल्यास ९९६०९२३६२७, ९६६५२६९३९३ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन त्याच्या पालकांनी केले आहे.