बीड दि.25 – कोविड १९ महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हयात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि.25 रोजी जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात लस पुरवण्यात आली असून दि.26 पासून लसीकरणास सुरुवात होणार आहे. केज उपजिल्हा रुग्णालयात लस साठ्या अभावी दि.25 रोजी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. परंतु उपजिल्हा रुग्णालयाला 750 लसीचे डोस प्राप्त झाले असून दि.26 पासून तालुक्यातील नागरिकांनी 18 वर्षे पुढील वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी केले आहे.
उपलब्ध लस साठयानुसार स्वा.रा.ती. वै.म.वरु अंबाजोगाई येथे ९००, जिल्हा रुग्णालय बीड ९००, उपजिल्हा रुग्णालय गेवराई, परळी, केज येथे प्रत्येकी ७५०, ग्रामीण रुग्णालय माजलगाव, धारूर, पाटोदा, आष्टी येथे प्रत्येकी ५५०, ग्रामीण रुग्णालय तालखेड,चिंचवण, धानोरा, नांदुरघाट, रायमोहा, स्त्री रुग्णालय नेकनुर येथे प्रत्येकी ३४०, प्रा.आ. केंद्र ग्रामीण, नागरी रुग्णालये, पोलीस हॉस्पीटल येथे प्रत्येकी ३४० या प्रमाणे उपलब्ध २७६०० कोव्हीशिल्ड लसीचे जिल्हयात वितरण करण्यात आले आहे.
दि. २६/6/२०२१ रोजी सर्व प्रा. आ. केंद्र, नागरी रुग्णालये, पोलीस हॉस्पीटल ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय बीड, स्वा.रा.ती. वै. म.व रु अंबाजोगाई येथे १८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांसाठी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहेत.
१८ वर्षापेक्षा जास्त वयाच्या जास्तीत जास्त नागरीकांनी https://ezee.live/Beed covid19-registration या लिंकवर नोंदणी करुन लसीकरणाकरीता टोकन क्रंमाक प्राप्त करुन घ्यावा, टोकन क्रमाकानुसार प्राप्त मेसेज / call नुसार लसीकरणाकरीता यावे, मेसेज नुसार लसीकरणाकरीता न आल्यास परत टोकन क्रंमाक प्राप्त करून घ्यावा लागेल. बीड शहरात चंपावती प्राथमीक शाळा नागरी रुग्णालय मोमीनपुरा, नागरी रुग्णालय पेठ बीड, पोलीस हॉस्पीटल येथे लसीकरण सुरु असुन नागरीकांनी जवळच्या लसीकरण केंद्रांवर नोंदणी करून लसीकरण करुन घ्यावे.
दरम्यान १८ पेक्षा जास्त वयाच्या नागरीकांनी नोंदणी करुन अपॉइंटमेट नुसार लसीकरण करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले असुन कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.