Site icon सक्रिय न्यूज

केज येथील चक्का जाम आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा -अनंत राऊत

केज येथील चक्का जाम आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा -अनंत राऊत
केज दि.२५ – ओ.बी.सी . समाजाच्या अतिरिक्त आरक्षणावर गडांतर आणणार्‍या सरकारच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला आहे ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले असून जोपर्यंत आरक्षण पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत ओबीसी समाज आंदोलन करत राहणार आहे.
                               याचाच एक भाग म्हणून दिनांक 26 जून २०२१रोजी संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलनाची हाक ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली असून त्यानुसार केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक 26 जून २०२१रोजी सकाळी 11 वाजता चक्काजाम आंदोलन होणार आहे तरी सर्व ओबीसी समाज बांधवांनी आंदोलनास उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे केज तालुका अध्यक्ष आनंतराव राऊत यांनी केले आहे.
शेअर करा
Exit mobile version