मुंबई दि.२८ – विद्यार्थ्यांना घरी बसल्याबसल्या शिक्षण मिळावे या हेतूने ऑनलाइन शिक्षणाचा खटाटोप सुरू आहे. गेल्या वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा तसंच कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत. या महामारीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लास सुरु करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून विद्यार्था ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करत आहेत. दरम्यान अशाच परिस्थितीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
राज्यात एका कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेस दरम्यान अचानक पॉर्न व्हिडीयो सुरु झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील विलेपार्लेच्या एका कॉलेजचे ऑनलाईन क्लास सुरु असताना मस्करीच्या भरात कोणीतरी पॉर्न व्हिडीओ सुरु केला. जसं या कॉलेजचं ऑनलाईन लेक्चर सुरु झालं तसं काही अज्ञांतांनी एक अश्लिल व्हिडीयो अपलोड केला.आणि हा व्हिडीयो सुरु झाला. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. जुहू पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान जुहू पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चार दिवसांपूर्वीची आहे. कॉलेजच्या एका प्राध्यापकांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. प्राध्यापकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. यामध्ये आयपीसी कलम 292, 570 आणि आयटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नसून ऑनलाइन मीटिंग आणि क्लासेस दरम्यान या पूर्वीही वेगवेगळ्या घटना घडल्या असून ऑनलाइन जेवढे फायदेशीर आहे तेवढेच त्याचे दुष्परिणाम ही अधूनमधून जाणवत आहेत.