Site icon सक्रिय न्यूज

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार, केज पोलिसांत गुन्हा दाखल……!

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार, केज पोलिसांत गुन्हा दाखल……!
केज दि.28 – तालुक्यातील एका 29 वर्षीय महिलेवर लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली असून सदर प्रकार कुणाला सांगितला तर तुला व तुझ्या पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे गेवराई तालुक्यातील एकावर केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
            पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेवराई तालुक्यातील काजळ वाडी येथील भाऊसाहेब लक्ष्मण आगुंडे याने लग्नाचे अमिष दाखवून व तुझ्या लेकरांना सांभाळतो म्हणून दि.25 जून ते 26 जून दरम्यान महिलेच्या इच्छेविरुद्ध नेकनूर शिवारात शारीरिक अत्याचार केले. तसेच सदर घटना कुणाला सांगितली तर तुला, तुझ्या नवऱ्याला व लेकरांना जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब आगुंडे याच्या विरोधात 376, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सीमाली कोळी ह्या पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version