Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात 30 वर्षीय महिलेचा विनयभंग…..!

केज तालुक्यात 30 वर्षीय महिलेचा विनयभंग…..!
केज दि.२९ – कुत्र्याला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका 30 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी चौघां विरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
             पिडीत महिलेचा भाऊ दि.28 रोजी सकाळी 11 वाजता मोटारसायकल वरून जात असताना कुत्र्याला धक्का लागला. या कारणा वरून यश दिपक वाघमारे याने शिवीगाळ केली असता पीडित महिला भांडण सोडवण्यास गेली होती. मात्र यावेळी दिपक मच्छीन्द्र वाघमारे याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करत विनयभंग केला.तर इतर तिघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
         पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून
दिपक मच्छिंद्र वाघमारे, विकास मच्छिंद्र वाघमारे, यश दिपक वाघमारे, सिंद्धात विकास वाघमारे (रा. विडा ता. केज) या चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रुक्मिणी पाचपिंडे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version