नवी दिल्ली दि.३० – बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच सीमा सुरक्षा दलामध्ये ग्रुप ‘बी’ आणि ग्रुप ‘सी’ पदांवर भरती निघाली आहे. BSF च्या भरती प्रक्रियेंतर्गत एअर विंग, पॅरा मेडिकल आणि वेटरनरी स्टाफसाठी रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी पुरुष आणि महिला उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी BSF च्या अधिकृत वेबसाईट (Official website) https://bsf.gov.in/Home वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची मुदत 26 जुलै 2021 आहे.
पॅरा मेडिकल स्टाफ मध्ये एसआय (स्टाफ नर्स) ग्रुप बी पोस्ट -37 पदे, एएसआय (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन), ग्रुप सी पोस्ट – 1 पद, एएसआय (लॅब टेक्निशियन) ग्रुप – सी पोस्ट – 28 पदे, सीटी (वॉर्ड बॉय, वॉर्ड गर्ल) ग्रुप सी पोस्ट – 9 पदे.तरवेटर्नरी स्टाफ मध्ये एचसी (वेटर्नरी) ग्रुप सी पोस्ट – 20 पदे, कॉन्स्टेबल (केनेलमन) ग्रुप सी पोस्ट – 15 पदे आहेत.एअर विंग मध्ये असिस्टंट एयरक्राफ्ट मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) – 49 पदे, असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (असिस्टंट सब इन्स्पेक्टर) – 8 पदे, कॉन्स्टेबल – 8 पदे आहेत.
इच्छूक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करताना सर्वात आधी BSF च्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागले. वन टाइम प्रोफाइल भरून आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल. यानंतर अलीकडच्या काळात काढलेले छायाचित्र, अंगठ्याचे निशाण अपलोड करावे लागले.तर विविध पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षा दरम्यान असले पाहिजे. याशिवाय आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी BSF च्या अधिकृत पोर्टलवरील नोटिफिकेशन वाचावे.
BSF च्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा……
https://bsf.gov.in/Home