नेकनूर दि. ३० – बीड तालुक्यातील नेकनूर जवळील दगडवाडी शिवारात विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या राधा किशोर लोखंडे वय ३० वर्ष राहणार दगडवाडी वस्ती नेकनुर या महिलेचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
आजूबाजूला कोणीच नसल्याने महिलेला कोणी वाचवण्यासाठी येऊ न शकल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. पीएसआय जाधव , पो. कॉ. सोनवणे, होमगार्ड कोरडे, श्रीमती डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोन दिवसांपासून शेतातील लाईट नसल्याने बीड तालुक्यातील दगडवाडी शिवारातील हनुमान मंदिराजवळील बाळू काळे यांच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी सदरील महिला गेली असताना पाय घसरून विहिरीत पडली. सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.