Site icon सक्रिय न्यूज

देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या युवतींसाठी सुवर्ण संधी……! 

देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या युवतींसाठी सुवर्ण संधी……! 

पुणे दि.1 – कोरोना काळात अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मात्र, याच काळात भारतीय सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींसाठी एक सुवर्णसंधी आहे. भारतीय लष्कराने सोल्जर जनरल ड्युटीसाठी (Indian Army Women Military Police Recruitment) भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीमुळे भारतीय मुलींचं लष्करात काम करण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

नुकतीच जनरल ड्यूटी- वुमेन मिलिट्री पोलीस भरती (Women Military Police) प्रक्रिया सुरु झाली असून लष्कराने ठरवून दिलेल्या योग्यतेचे निकष पूर्ण करणाऱ्या मुलींना २० जुलै २०२१ पर्यंत https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx येथे जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. पुण्यासह अंबाला, लखनौ, जबलपूर, बेळगाव आणि शिलांग येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

जनरल ड्यूटी- वुमेन मिलिट्री पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना दहावीत 45 टक्के गुण असणे बंधनकारक आहे. तसंच साडे सतरा ते २१ वय असणारे उमेदवार या प्रक्रियेसाटी पात्र असतील. सोबतच उमेदवाराची उंची कमीत कमी १५२ सेमी असणं गरजेचं आहे.जनरल ड्यूटी- वुमेन मिलिट्री पोलीस भरतीच्या उमेदवारांची निवड फिटनेस टेस्ट (PFT) आणि कॉमन एन्ट्रंस एक्झामच्या (CEE) माध्यमातून केली जाईल.

शेअर करा
Exit mobile version