केज दि.2 – घरात लिंबू टाकून भानामती केली असे का म्हणतेस या कारणावरून घरात घुसून लाथाबुक्याने बेदम मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज शहरातील गणेश भागात घडली. याप्रकरणी केज पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील गणेश नगर भागातील ज्योती चंद्रकांत वळसे व त्यांची आई या दोघी १ जुलै रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घरी असताना फुलाबाई वणीदेव चौरे या अनुष्का वणीदेव चौरे, वणीदेव चौरे, शनिदेव चौरे व त्यांचा मेव्हणा यांना घेऊन त्यांच्या घरात आल्या. फुलाबाई यांनी घरात लिंबू टाकून भानामती केली असे का म्हणतेस असे म्हणत ज्योती वळसे व त्यांच्या आईस शिवीगाळ करीत लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले. अशी फिर्याद ज्योती वळसे यांनी दिल्यावरून फुलाबाई चौरे, अनुष्का चौरे, वणीदेव चौरे, शनिदेव चौरे व फुलाबाई यांचा मेव्हणा या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक मंगेश भोले हे पुढील तपास करत आहेत.