केज दि.३ – प्लॉट खरेदीसाठी माहेरहून पाच लाख रु घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यतील टाकळी येथील भाग्यश्री हिचा सहा वर्षांपूर्वी तुकुचिवाडी येथील नवनाथ चौरे याच्या सोबत विवाह झाला होता. परंतु भाग्यशी हिस तिचा नवरा नवनाथ चौरे, सासरा शिवाजी चौरे हे संगनमत करून प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रु घेऊन येण्याच्या मागणीसाठी छळ करीत आहेत. तसेच चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून दिले आहे. तसेच तू नांदायला येऊ नकोस असे म्हणत आहेत.
भाग्यश्री चौरे हिच्या तक्रारी नुसार दि.३ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात नवनाथ चौरे, सासरा शिवाची चौरे आणि भाच्ची शामल चौरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पोलीस जमादार रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.