Site icon सक्रिय न्यूज

शेतातून येणाऱ्या महिलेवर अत्याचार ; आरोपी जेरबंद…..! 

शेतातून येणाऱ्या महिलेवर अत्याचार ; आरोपी जेरबंद…..! 
केज दि.४ – शेतातून घरी येत असलेल्या महिलेला वाटेत एका जीपमध्ये बळजबरीने बसून नेत गावाच्या शिवारात अत्याचार केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
                  केज तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहित महिला ही २ जुलै रोजी सायंकाळी शेतातून एकटीच घरी येत होती. आरोपी फुलचंद रामभाऊ गायकवाड ( रा. घाटेवाडी ता. केज ) याने महिलेला जीपमध्ये बळजबरीने बसवून घाटेवाडी शिवारातील शिंदे नामक शेतकऱ्याच्या शेतात नेवुन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला, तुझा नवरा व मुलांना जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. अशी फिर्याद पिडीत महिलेने ४ जुलै रोजी दिल्यावरून आरोपी फुलचंद गायकवाड याच्याविरुध्द केज पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास फौजदार सीमाली कोळी या करीत आहेत.
शेअर करा
Exit mobile version