Site icon सक्रिय न्यूज

पैश्याच्या देण्याघेण्यावरून एकाला पळवले, पत्नीची केज पोलीसात तक्रार.….…!

पैश्याच्या देण्याघेण्यावरून एकाला पळवले, पत्नीची केज पोलीसात तक्रार.….…!
केज दि. ४ – पैश्याच्या देण्याघेण्यावरून पतीला पळवून नेल्याची तक्रार केल्यावरून केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         केज तालुक्यातील बनकरंजा येथील सहदेव कोंडीबा नागरगोजे ह्यांना दि.३ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता केज बसस्टँड परिसरातून पैश्याच्या देण्याघेण्यावरून सिल्वर कलरच्या इनोव्हा गाडीतून बाळू चौरे रा.जिवाचीवाडी यांनी पळवून नेल्याची तक्रार सहदेव नागरगोजे यांची पत्नी कांचन सहदेव नागरगोजे यांनी दिली आहे.
            सदर फिर्यादीवरून बाळू चौरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे करत आहेत.

मारहाण करून महिलेचा विनयभंग

केज दि.४ – भांडणाची कुरापत काढून दोघांनी संगनमत करून एका महिलेस बेदम मारहाण करत विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली असून एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दि.३ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता पीडित महिला दारासमोर बसलेली असता धनराज विठ्ठल मुंडे, रेखा धनराज मुंडे ( रा. देवगाव ता. केज) हे दोघे तिथे आले व तुझ्या नवऱ्याने चारी काढून आमच्या शेतात पाणी का लावले असे म्हणत फिर्यादी महिलेस शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तर धनराज मुंडे याने लज्जास्पद बोलून पीडित महिलेचा विनयभंग केला.
          सदर प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून धनराज मुंडे व रेखा मुंडे यांच्या विरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक चौरे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version