Site icon सक्रिय न्यूज

गावठी दारुसह साहित्य जप्त, केज पोलिसांची कारवाई…..!

गावठी दारुसह साहित्य जप्त, केज पोलिसांची कारवाई…..!
केज दि.5 – तालुक्यातील बोरगाव येथे बेकायदेशीर गावठी दारू तयार करून विकत असल्या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 17 लिटर गावठी दारुसह दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
            बोरगाव येथे रुक्मिणबाई बापू शिंदे ही महिला बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती मिळल्यावरून केज पोलिसांनी दि.३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता सदरील ठिकाणी धाड टाकली. यावेळी त्या ठिकाणी 17 लिटर गावठी दारू व साहित्य असा एकूण ६८०० रुपयांचा माल मिळून आला.
         दरम्यान बिट अंमलदार अमोल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून रुक्मिणबाई बापू शिंदे या महिलेवर केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल श्री.गवळी हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version