Site icon सक्रिय न्यूज

बँकेत नौकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी……!

बँकेत नौकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी……!

नवी दिल्ली दि.६ –  सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. एसबीआयने 5 जुलै रोजी अप्रेरेंटिस पदाच्या भरतीसाठी एक नोटीफिकेशन जारी केलं आहे. यासाठीच रजिस्ट्रेशन हे 6 जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरू झालं आहे.

योग्य आणि इच्छूक उमेदवार 26 जुलै 2021 पर्यंत वेबसाईटवर जाऊन यासाठी अर्ज करू शकतात. देशभरातील विविध बँकांमध्ये अप्रेरेंटिससाठी जवळपास 6100 पद उपलब्ध आहे.

अर्ज करण्याची तारीख – 6 जुलै 2021 तर शेवटची तारीख – 26 जुलै 2021 आहे. यामध्ये 6100 पदांची भरती होणार असून उमेदवाराचं वय हे 20 ते 28 वर्षांमधील असणं गरजेचं आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून, संस्थानातून ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली पाहिजे. उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा यावर केली जाणार आहे.

दरम्यान योग्य आणि इच्छूक उमेदवार हे एसबीआयच्या वेबसाईटवर जाऊन 6 जुलै ते 26 जुलै 2021 पर्यंत कसा अर्ज करायचा इथे https://sbi.co.in/web/careers/current-openings पाहू शकतात.

शेअर करा
Exit mobile version