अंबाजोगाई दि. ८ – ( पांडुरंग केंद्रे) अंबाजोगाई शहरातील प्रतिष्ठित नागरिकाला चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण करुन जातीवाचक अर्वाच्च शिवीगाळ करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेले ठिय्या आंदोलन गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरुच राहीले आजुबाजूच्या गावातुन आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला तर अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी आंदोलनास्थळी भेट देत आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील डॉ सुहास यादव यांच्यावर विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात डॉ सुहास यादव यांना जाणीवपूर्वक गुंतविण्यात आल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा दावा आहे. सध्या डॉ सुहास यादव फरार असल्याने पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. या दरम्यान डॉ सुहास यादव आणि त्यांचे चुलतभाऊ विलास यादव यांच्यात काही फोन काॅल झाल्याचे पोलीसांचे म्हणने आहे त्यामुळे चौकशी करण्यासाठी म्हणून स्वत: डीवायएसपी सुनील जायभाये यांनी मंगळवारी दि. ६ जुलै रात्री विलास यादव यांना प्रशांत नगर भागात गाठले तिथे जायभाये यांनी विलास यादव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. कुटुंबाबबतही आक्षेपार्ह वापरली असे क्रांती मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमुद आहे या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजदेखील वायरल झाले आहेत. त्यानंतर यादव यांची सुटका करण्यात आली या घटनेचे पडसाद बुधवार पासुन उमठण्यास सुरवात झाली यादव यांना चौकशीच्या नावाखाली बेदम मारहाण व जातीवाचक अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारे डीवायएसपी सुनील जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले.
जायभाये यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला गुरुवारी या आंदोलनात तालुक्यातील चनई व मोरेवाडी येथील ग्रामस्थांनी सहभाग घेतला आंदोलनस्थळी दिवसभर गर्दी दिसुन आली. तसेच जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी देखील आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दर्शविला. तसेच शुक्रवारी तळेगाव घाट हाताेला आणि बर्दापुर तसेच शनिवारी धायगुडा पिंपळा आणि मागरवाडी येथील मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अॅड महादेव जाधव यांनी सांगितले. एखाद्या चांगल्या कर्तुत्वान अधिकाऱ्याची बदली होत असेल अंबाजोगाईकरांनी त्याला नेहमी विरोध केला आहे अक्षरश: चार पाच दिवस स्वतः चे उद्योग धंदे बंद करून अंबाजोगाईकरांनी कडकडीत बंद पाळला आणि बदली रद्द करण्यासाठी शासनाला भाग पाडले त्याच अंबाजोगाईत आज एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मोठे आंदोलन सुरू करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
दरम्यान गुरुवारी आंदोलनस्थळी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, जेष्ठ नेते अशोकराव देशमुख जेष्ठ पत्रकार अशोक गुजाळ जि प सदस्य राजेसाहेब देशमुख नगरसेवक बबनराव लोमटे अंबासाखर कारखान्याचे व्हाईस चेरमन हनुमंतराव मोरे नगरसेवक सारंग पुजारी डॉ सोमवंशी अॅड बाळासाहेब पाटील अॅड अजित लोमटे प्रा प्रशांत जगताप आबासाहेब पांडे महेश लोमटे संजय भोसले वैजनाथ देशमुख प्रविण ठोंबरे अॅड संतोष लोमटे राहुल मोरे प्रशांत अादनाक गोविंद पोतंगले ज्ञानोबा कदम अॅड रणजित सोळंके बालाजी शेरेकर रविकिरण देशमुख भीमसेन लोमटे विजयकुमार गंगणे विजय भोसले अंगद गायकवाड धर्मराज सोळंके स्वप्निल सोनवणे लहु शिंदे बाबासाहेब शिंदे राणा चव्हाण प्रकाश बोरगावकर अॅड प्रशांत शिंदे अॅड अभिजीत लोमटे अॅड भागवत गठाळ ईश्वर शिंदे रणजित डांगे श्रीकांत कदम अतुल जाधव महेश जगताप राजकुमार गंगणे संजय कदम आदींनी सहभागी झाले होते दरम्यान या प्रकरणी आ नमिता मुंदडा यांनी गुरुवारी मुंबई गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहे पोलीस महासंचालक यांची भेट घेतली घडलेली घटना आणि सुरू असलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी आंदोलकांची बाजु त्यांच्या समोर मांडली तसेच या घटनेस जबाबदार असणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी केली.