Site icon सक्रिय न्यूज

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात तर भाई जगताप बैलगाडीतून कोसळले……!

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात तर भाई जगताप बैलगाडीतून कोसळले……!

हिंगोली दि.१० –  राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. वर्षा गायकवाड या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. आज सकाळी वर्षा गायकवाड यांच्या कारला भरधाव टेम्पोनं मागच्या बाजून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दोन दिवसांपासून हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. त्या हिंगोलीच्या पालकमंत्री आहेत.

वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना कारला टेम्पोनं मागच्या बाजूनं धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेली नाही. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला मागच्या बाजून धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूनं नुकसान झालं आहे. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.

             तर मुबंईमधील अँटोप हिल येथील भरणी नाका परिसरात महागाई विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन सुरु असताना बैल गाडीवर मुबंई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्यकर्ते उभे राहून घोषणा देते होते. यावेळी बैलगाडीवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते जमा झाल्याने बैलगाडी कोसळली. या घटनेत काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले.

इंधन दरवाढी विरोधात आज काँग्रेसतर्फे अंटोप हिलमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा होता.मात्र या मोर्चाचा फज्जा उडाला. कारण ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती, ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते या बैलगाडीवर चढले. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने कोणला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले असून बैलाना जखमा झाल्या आहेत.

शेअर करा
Exit mobile version