Site icon सक्रिय न्यूज

अखेर नीट परीक्षेची तारीख जाहीर, 3862 केंद्रांवर होणार परीक्षा…….!

अखेर नीट परीक्षेची तारीख जाहीर, 3862 केंद्रांवर होणार परीक्षा…….!

नवी दिल्ली दि.१२ – नीट परीक्षेच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. NEET (UG) 2021 ही परीक्षा 12 सप्टेंबरला होईल. परीक्षेचं आयोजन कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करुन केल जाईल, असं सांगण्यात आलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती प्रधान यांनी दिली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोरोना नियमांचं पालन करुन परीक्षांचं आयोजन केलं जाईल, अशी माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर मास्क उपलब्ध करुन दिले झाणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचं आणि बाहेर पडण्याची वेळ निश्चित केली आहे. कॉन्टॅक्टरहित नोंदणी, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळून बैठक व्यवस्था केली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. देशातील 198 शहरांमध्ये परीक्षा आयोजित केली जाईल. तर 2020 च्या तुलनेत परीक्षा केंद्रांची संख्या 3862 करण्यात आली आहे.

देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस आणि बीडीएस सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट युजी 2021 (NEET UG 2021) आता 12 सप्टेंबरला आयोजित केली जाईल.

नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. यानंतर उमेदवारांनी प्रथम होम पेजवर जाणे आवश्यक आहे. यानंतर नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा. यानंतर अधिसूचनेमधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. यानंतर आयडीची रजिस्टर्ज बनवा आणि पुन्हा लॉग इन विभागात जा. मग आपल्या क्रेडेन्शियल्समध्ये की आणि लॉग इन करा. अॅप्लिकेशन फॉर्म डिस्प्ले स्क्रीनवर दिसेल. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सर्व सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा. या दस्तऐवजांचे प्रिंटआउट घ्या.

दरम्यान या वर्षीपासून नीट युजी परीक्षा 11 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यात इंग्रजा, दिंदी, आसामी, गुजराती, बंगाली, मराठी, ओडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आणि उर्दू आदि भाषांचा समावेश असेल.

शेअर करा
Exit mobile version