बीड दि.१३ – मागील काही महिण्यापासुन पोलीस ठाणे वडवणी हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना घडत होत्या. मोटार सायकल चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने आर. राजा, पोलीस अधीक्षक साहेब बीड यांच्या आदेशावनरुन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे वडवणी प्रभारी अधिकारी सपोनि नितीन मिरकर, पोउपनि जयसींग परदेशी, पोह बिंबीसार डोळस, विठ्ठल गिते पोना मनोज जोगदंड, लखन गंगावणे, विलास खरात असे वडवणी पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरीच्या घटना घडु नयेत म्हणुन विशेष पथकाची नेमणुक करण्यात आली होती.
सदर पथकाने मोटार सायकल चोरी होवु नयेच म्हणुन पोलीस ठाणे वडवणी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस ठाणे वडवणी गुरनं. 140/2021 कलम 379 भादवि मधील वडवणीचे हद्दीतुन दि.07/06/2021 रोजी चिचांळा ता.वडवणी जि.बीड येथुन मोटार सायकल हिरो कं. स्पेल्डर पासीग क्रं.MH 23 AC-6620 अशी मोटार सायकल हि ईसम नामे चद्रकांत हरीभाऊ घोलप रा.चिचंवडगाव ता.वडवणी जि. बीड याने चोरी केली आहे अशी खात्रीलायक माहीती होती. सदर माहितीवरून चंद्रकांत घोलप हा मोटार सायकल चोरी करण्याच्या उद्देशाने वडवणी शहरात फिरत असताना त्यास दि.06/07/2021 रोजी शिफातीने पकडुन गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्याच्या तपासात आरोपी चंद्रकांत घोलप याने बीड जिल्ह्यात बीड, वडवणी, परळी व अहमदनगर जिल्हा येथुन चोरलेल्या एक होन्डा शाईन गाडी, हिरो कंपनीच्या स्पेल्डर प्लस 03 मोटार सायकल, हिरो कंपनीच्या पॅशन प्रो. 04 मोटार सायकल, हिरो कंपनीच्या सीडी डिलक्स 01 मोटार सायकल अशा एकुन 09 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामुळे बीड व अहमदनगर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी चंद्रकांत घोलप हा अटकेत असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन मिरकर, पोउपनि श्री. जयसींग परदेशी, पोह/बिंबीसार डोळस, विठ्ठल गिते, पोना / मनोज जोगदंड, लखन गंगावणे, विलास खरात यांनी केली.