Site icon सक्रिय न्यूज

एस.पी.साहेबांकडे माझ्या विरुद्ध तक्रार का केली असे म्हणत मारहाण, केज पोलिसांत गुन्हा दाखल……!

एस.पी.साहेबांकडे माझ्या विरुद्ध तक्रार का केली असे म्हणत मारहाण, केज पोलिसांत गुन्हा दाखल……!
केज दि.१५ – एस.पी. साहेबांकडे माझी तक्रार का केली ? असे म्हणत फिर्यादीस लोखंडी गजाने मारहाण केल्याच्या तक्रारीवरून केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      शहरातील रोजा मोहल्ला भागात राहणारे अखिल बाबामियाँ इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि.१२ जुलै रोजी रोजा मोहल्ला येथे सायंकाळी ५.४५ च्या दरम्यान कलीम सलीम इनामदार, नासेर (राजु) नुरोद्दीन शेख, नुरजहाँ नासेर शेख, सुरय्या उर्फ मन्नी सलीम इनामदार सर्व रा.राजीवनगर बीड, फैसल बदीयोद्दीन काझी, परवीन मुस्ताक काझी रा. केज हे सर्व आले व कलीम इनामदार यांनी माझी एस.पी. साहेबांकडे तक्रार का केली म्हणत लोखंडी गज डोक्यात मारून मुक्कामार दिला. तर इतरांनीही शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. सदरील प्रकरणी अखिल बाबा मियाँ यांच्या फिर्यादिवरून ६ जणां विरोधात केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार श्रीराम काळे हे करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version