Site icon सक्रिय न्यूज

केज उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग सुरू…….! 

केज उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग सुरू…….! 
केज दि.१५ –  येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग करण्यात आला असून किडलेले दात व दाढ काढणे, सिमेंट फिलिंग करणे व इतर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाण्याची गरज नसल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली.
                     केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग सुरू नव्हता त्यामुळे दातांच्या आजाराच्या रुग्णांना शहरातील खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. मोठा रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. त्यामुळे दंत शल्य चिकित्सा विभाग सुरू करण्याची मागणी रुग्णांची होती. याची दखल घेत हा विभाग सुरू करण्यात आला असून डॉ. रमण दळवी हे या विभागात कार्यरत झाले आहेत.
              या विभागातून मौखिक रोग निदान, मुख कर्करोग निदान, हिरड्यांच्या विविध आजारांवर उपचार, तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन, दातांची कीड व लहान मुलांच्या दातांच्या आजारावर उपचार, दाढ व दात काढणे, सिमेंट फिलिंग करणे, स्केलिंग करणे या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली असून रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version