केज दि.१६ – पाण्याच्या बोअरच्या खर्चाच्या पैशावरून एकाचे काठीने डोके फोडल्याची घटना घडली असून केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १५ जुलै रोजी सकाळी ११.३० वा. च्या दरम्यान सतीश रोडे हा चिंचोली पाटी जवळील त्याच्या शेतात असताना रंगनाथ रोडे हा याच्या जवळ आला. त्याने सतीश रोडे यास घेण्यासाठी झालेल्या खर्चाचे अर्धे पैसे मागितले आणि शिवीगाळ करून लाकडी काठीने सतीश रोडे याच्या कपाळावर मारुन दुखापत केली. तसेच लाथाबुक्याने मारुन मुक्कामार देत जिवे मारण्याची धमकी दिली.
सतीश रोडे याच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात रंगनाथ रोडे रा. केज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला जमादार रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.