Site icon सक्रिय न्यूज

ससे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू……! 

ससे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू……! 
केज दि.१६ – उसाच्या शेतात ससे पकडण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा शेतात लावलेल्या तारेच्या कुंपणात सोडलेल्या विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील गदळेवाडी शिवारात घडली. याप्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
           केज तालुक्यातील गदळेवाडी येथील शेतकरी बापु अर्जुन शिंदे यांनी त्यांच्या शिवारातील जमिनीतील उसाच्या पीकाच्या शेतातील अँल्युमिनियमच्या तारेचे कुंपण करून त्यात विजेचा करंट सोडून ठेवलेला होता. दरम्यान, १५ जुलै रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मयत शिवाजी आश्रुबा सांगळे ( वय १९, रा. शिरुरघाट ता. केज ) हा तरुण ससे पकडण्यासाठी या उसाच्या शेतात गेला होता. मात्र शेतात प्रवेश करण्यापूर्वी शिवाजी याचा तारेच्या कुंपणाला स्पर्श होताच त्याला विजेचा शॉक लागल्याने शिवाजी सांगळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. १६ जुलै रोजी नांदूरघाट पोलीस चौकीचे जमादार मुकुंद शामराव ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकरी बापु अर्जुन शिंदे याच्याविरुध्द केज पोलिसात कलम ३०४ ( अ ) भादवी अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सानप हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version