Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्याचा निकाल 99.92 टक्के तर 81 पैकी 79 शाळांचा निकाल 100 टक्के……!

केज तालुक्याचा निकाल 99.92 टक्के तर 81 पैकी 79 शाळांचा निकाल 100 टक्के……!
केज दि.१७ – कोरोनामुळे अंतर्गत मूल्यमापणावर आधारित जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या निकाल रेकॉर्ड झाले असून केज तालुक्यातील 81 पैकी 79 शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून तालुक्याचा एकूण निकाल 99.92 टक्के एवढा लागला आहे.
          केज तालुक्यातील एकूण 81 शाळांमधून 4173 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यामधून 4171 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये विशेष प्राविण्यात 3140, प्रथम श्रेणीत 958, द्वितीय श्रेणीत 66 तर तृतीय श्रेणीत 04 असे एकूण 4168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी जाहीर करण्यात आलेला निकाल रेकॉर्ड ब्रेक असून केवळ दोन शाळांचा निकाल 100 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे केवळ 2 विद्यार्थी अनुपस्थित तर 3 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

                    दरम्यान तालुक्यातील पुरुषोत्तमदादा सोनवणे माध्यमिक विद्यालय सारणी शाळेचा निकालही 100 टक्के लागला असून 124 पैकी 109 विद्यार्थी विशेष प्राविण्यात तर 15 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेचे सचिव राहुल सोनवणे, मुख्याध्यापक पी.एच.लोमटे यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदानी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version