Site icon सक्रिय न्यूज

पोलीस भरतीचा शासन आदेश जारी,तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना……!

पोलीस भरतीचा शासन आदेश जारी,तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना……!

मुंबई दि.१७ – महाराष्ट्र पोलीस दलात हजारो पदांची भरती केली जाणार असून, गृह विभागाकडून शासन आदेश जारी केलाय. शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून 5 जुलै 2021 रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षणाच्या अनुषंगानं धोरणात्मक बाबींचा निर्णय असल्यानं तो गृह विभागांतर्गत पोलीस भरतीसाठी लागू करणे आवश्यक आहे.सदर शासन निर्णय गृह विभागाकडून रद्द करण्यात येत असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई आणि राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती प्रक्रिया 2019 सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जुलै 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार राबवण्यात येणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटलांनी केली होती. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने 7 हजरा पदे भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.

दरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी 5200 जागांवर भरती केली जाईल, अशी घोषणा केली होती. तर, उर्वरित 7 हजार पदांची भरती नंतर केली जाईल अशी माहिती दिली होती. औरंगाबाद येथे पोलीस दलाच्या अनुषंगानं विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं होतं.

शेअर करा
Exit mobile version