Site icon सक्रिय न्यूज

अखेर 25 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू……!

अखेर 25 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू……!

बीड दि.18 – स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र उमेदवार बऱ्याच दिवसांपासून या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. नोटिफिकेशन पहिल्यांदा मे महिन्यात जारी होणार होतं. मात्र, अखेर नोटिफिकेशन जारी करण्यात आल्यानं उमदेवारांना दिलासा मिळाला आहे. अखेर 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया होणार आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25271 पदांवर भरती प्रक्रिया राबवली होती. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 17 जुलै असून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख- 31 ऑगस्ट (रात्री 11.30 वाजेपर्यंत आहे. तर ऑनलाईन फी जमा करण्याची अखेरची तारीख – 2 सप्टेंबर (रात्री 11.30 वाजता असणार आहे. ऑफलाईन चलन जनरेट करण्याची अखेरची तारीख- 4 सप्टेंबर रात्री 11.30 वाजेपर्यंत राहील. चलनाद्वारे फी जमा करण्याची अखेरची तारीख – 7 सप्टेंबर असून टियर – 1 परीक्षा (सीबीटी) ची तारीख- नंतर कळवली जाणार आहे.

यामध्ये बीएसएफ 7545, सीआयएसएफ  8464, एसएसबी 3806,
आयटीबीपी 1431,आसाम रायफल्स  3785, एसएसएफ  240 जागा असून
यावेळी सीआरपीएफ आणि एनआयएमध्ये कोणत्याही जागा निघालेल्या नाहीत. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर ज्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असेल ते अर्ज दाखल करु शकतात.

पात्रतेमध्ये उंची पुरुष उमेदवार – 170 सेमी, महिला उमेदवार – 157 सेमी, छाती पुरुष उमेदवार – 80 सेमी. (फुगवून – 85 सेमी) अशी निश्चित करण्यात आली आहे.तर उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना पे लेवल -3 च्या प्रमाणे 21700-69100 रुपये पगार मिळणार आहेत.उमेदवार स्टाफ सिलेक्शन कमिशनची ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात.

शेअर करा
Exit mobile version