केज दि.१८ – तालुक्यातील बेलगाव येथील नदीपात्रात शनिवार दि.१७ रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्या पथकाने दोन ट्रॅक्टर व ट्रॉल्या वाळू भरताना पकडण्यात आल्या. सदरचे ट्रॅक्टर हे पुढील कारवाईसाठी तहसीलदार केज यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरील कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. आरसूळ, मंडळ अधिकारी श्री. काशीद व वाहन चालक श्री. लाड यांनी केली.
दरम्यान मागच्या कित्येक महिन्यांपासून केज तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरीचे प्रकार घडत आहेत. कित्येक कारवाया ही झाल्या परंतु वाळू उपसा करणारे कायद्याची भीती न बाळगता अवैध उपसा करत आहेत.यावर कांहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.