Site icon सक्रिय न्यूज

बीडचे प्र. जिल्हाधिकारी ”ऍक्शन मोड” मध्ये, विविध ठिकाणी हॉटेल,  ढाबे  आणि दुकानांवर दंडात्मक कारवाई…….!

बीडचे प्र. जिल्हाधिकारी ”ऍक्शन मोड” मध्ये, विविध ठिकाणी हॉटेल,  ढाबे  आणि दुकानांवर दंडात्मक कारवाई…….!
दि. १८ – जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल , ढाबे, व्यावसायिक आणि नागरिकांवर प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी कारवाई केली. त्यांनी आज बीड शहर, मांजरसुंबा, पाली, कपिलधार आदी ठिकाणी अचानक पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात थेट दंडात्मक कारवाई केली.
                   यामध्ये मांजरसुंबा येथील कन्हैया ढाबा आणि पाली येथील हरियाणा हॉटेल यांच्यावर प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.  याच बरोबर समनापुर येथील हॉटेल नक्षत्र,  हॉटेल जायका आदी ढाबे आणि हॉटेल्सवर दहा हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी कपिलधार येथील येथे भेट दिली.  निर्बंध लागू असताना देखील पर्यटनासाठी गर्दी केलेल्या आणि कोणत्याही नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती तसेच सुरू असलेल्या विविध व्यावसायिक दुकाने यांचा वर कारवाई केली.कोरोना संसर्ग नियंत्रणात राखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे नागरिकाने त्यांनी पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. ठोंबरे यांनी केले.
                यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर,  संबंधित क्षेत्रीय अधिकारी महसूल आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंडल अधिकारी श्री. इंगोले , श्री. साळुंखे , पोलिस अधिकारी श्री. रोडे यासह विविध अधिकारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.
शेअर करा
Exit mobile version