केज दि.२० – येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी आलेले लसीचे डोस संपले असून लसीचा तुटवडा असल्याने आज लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली.
जेवढी लस उपलब्ध झाली होती त्याप्रमाणे लसीकरण झाले असून सध्या लस उपलब्ध नसल्याने तूर्त लसीकरण बंद राहणार आहे.परंतु येत्या दोन दिवसांत लस उपलब्ध होण्याची अपेक्षा असून पुन्हा लसीकरण सुरू होईल. तरी लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी लसीकरणास येऊ नये. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय राऊत यांनी दिली आहे.