Site icon सक्रिय न्यूज

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून पित्याची गळफास घेऊन आत्महत्या……! 

मुलाच्या मृत्यूच्या नैराश्यातून पित्याची गळफास घेऊन आत्महत्या……! 
केज दि.२१ – सात महिन्यांपूर्वी एकुलत्या एक मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू झाल्याने या नैराश्यातून ५० वर्षीय पित्याने आपल्या सासुरवाडीत लिंबाच्या झाडास गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना डिघोळअंबा ( ता. अंबाजोगाई ) येथे बुधवारी दुपारी घडली. कैलास यादवराव वरपे ( रा. साळेगाव ता. केज ) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे.
         साळेगाव येथील कैलास यादवराव वरपे ( वय ५० ) यांच्या प्रशांत या १६ वर्षीय एकुलत्या एक मुलाचा मेंदूच्या आजाराने २२ नोव्हेंबर २०२० रोजी सोलापूरच्या रुग्णालयात मृत्यू झाला होता. तेंव्हापासून मुलाच्या मृत्यूच्या विरहाने कैलास वरपे हे खचून गेले होते. या नैराश्यातून त्यांनी टोकाची भूमिका घेत त्यांनी बुधवारी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान डिघोळअंबा ( ता. अंबाजोगाई ) या सासुरवाडीत मेव्हणे दगडू संभाजी मुळे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या आदेशावरून पोलीस नाईक नानासाहेब धुमाळ, पोलीस नाईक कल्याण सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांचे मेव्हणे दगडू संभाजी मुळे ( रा. डिघोळअंबा ) यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version