Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात…..!

बीड जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात…..!

बीड दि.२६ -आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांना 80 हजाराची लाच घेतांना पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने सोमवार (दि.26) रोजी दुपारी ही कारवाई केली.

लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, (पोलीस स्टेशन अंभोरा, ता.आष्टी, जी. बीड रा.तिरूपती पार्क, पिसादेवी पार्क – A प्लाँट नंबर 02 औरंगाबाद ) यांना पकडण्यात आलं आहे. त्यांनी 20 जुलै रोजी तक्रारदारविरूध्द अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हयात मंजूर असलेला अटकपूर्व जामीन हायकोर्टाकडून रद्द न करण्यासाठी व गुन्ह्यात असलेल्या गाड्या जप्त न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती 80 हजार रूपये देण्याचं ठरलं. त्यांनतर सोमवारी औरंगाबाद एसीबीने कारवाई करत लोखंडे यांना पकडलं. याबाबत अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर करा
Exit mobile version