Site icon सक्रिय न्यूज

अंबाजोगाई – कळंब महामार्गावर चक्काजाम, वाहतूक ठप्प……!

अंबाजोगाई – कळंब महामार्गावर चक्काजाम, वाहतूक ठप्प……!
केज दि.२७ – तालुक्यातील होळ, बनसारोळा, युसूफवडगाव गटातील बहुतांशी रस्ते रहदारी लायक राहिलेले नाहीत.वारंवार मागणी निवेदन करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे रस्त्यांच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली कळंब- अंबाजोगाई राज्य महामार्गावर  बोरीसावरगाव येथे  मंगळवारी रोजी एक तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
             दरम्यान  तहसीलदार दुलाजी मेंडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन कांबळे, जि .प.बांधकाम उपविभाग केज अभियंता बी. ई.खेडकर आदींच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आक्रमक घोषणाबाजी करत प्रशासन व लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध करण्यात आला. कांही काळ वाहतूक ठप्प झाली होती. तर यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version