Site icon सक्रिय न्यूज

शेततळ्यात बुडून दोघा भावंडांचा मृत्यू, केज तालुक्यातील दुर्दैवी घटना……!

शेततळ्यात बुडून दोघा भावंडांचा मृत्यू, केज तालुक्यातील दुर्दैवी घटना……!

केज दि.२७ – शेततळ्यात बुडून दोन सख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना केज तालुक्यातील लाडेवडगाव येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हर्षद माधव लाड (१० वर्ष) आणि उमेद माधव लाड (७ वर्ष) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावंडांची नावे आहेत.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version