बीड दि.२७ – समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक तथा राज्याचे मंत्री मा.ना. छगनरावजी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समता परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महाड येथे पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि पाण्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उद्योग व पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे,आ. रोहित पवार, आ.अनिकेत तटकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विशेष म्हणजे आ. पवार,ना. तटकरे यांनी स्वतः पूरग्रस्त नागरिकांना समता परिषदेच्या अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.
याप्रसंगी समता परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील, समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, नितीन राऊत, धनंजय काळे, धर्मराज दुधाळ, महेश व्यवहारे आदीं समता सैनिकांची उपस्थिती होती.
दरम्यान मागच्या दोन वर्षापूर्वी देखील सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या आपत्ती प्रसंगी बीड जिल्हा समता परिषदेने मदत कार्य राबवून येथील पूरग्रस्त बांधवांना अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था केली होती. सोमवारी रायगड जिल्ह्यातील महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे पूरग्रस्त बांधवांना ५ हजार चिवड्याचे पॅकेट्स, ३०० बिसलरी पाण्याचे बॉक्स, ५ हजार बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.