बीड दि.२८ – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण प्रायोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायीक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांची निवड केली जाते. त्यातील काही अधिका-यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती सुध्दा मिळते. मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परिक्षेसाठी अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना दरमाह रु.८,०००/ मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन देण्याबाबत व त्याचे प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देणेबाबत संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. साधारणतः ४०० विद्यार्थ्यांना या मार्फत दरवर्षी लाभ देण्यात येणार आहे.
या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी “सारथी” मार्फत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी विधी पदवीधर किंवा वकील, ऑटोर्नी अधिवक्ता असावा. पात्र उमेदवारांना मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर याठिकाणी निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येईल. हा उपक्रम पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीन टप्यामध्ये राबिण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणासाठी विद्याथ्र्यांची निवड सामायिक प्रवेश चाचणी (CET) व्दारे गुणवत्तेनुसार करण्यात येईल.
दरम्यान महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात परंतु योगय मार्गदर्शन व प्रशिक्षणा अभावी निश्चित असे ध्येय प्राप्त करु शकत नाहीत. तरी ‘सारथी ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक श्री अशोक काकडे यांनी केले आहे. वरील सर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३.०८.२०२१ आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन
व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांनी केले आहे.
जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक पहावी…..
Website: www.sarthi- maharashtragov.in