Site icon सक्रिय न्यूज

देशातील 22 चिंताजनक जिल्ह्यांमध्ये बीड आणि सोलापूर चा समावेश…..!

देशातील 22 चिंताजनक जिल्ह्यांमध्ये बीड आणि सोलापूर चा समावेश…..!

नवी दिल्ली दि.२८ – प्रतिनिधी  देशात कोरोना बाधितांचा आकडा दररोज कमी जास्त होत आहे. मात्र अशा स्थितीत राज्यातील बीड आणि सोलापूर जिल्ह्यात वाढते कोरोना बाधित होणे चिंताजनक असल्याचे मत  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या  वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नीती आयोगाचे विनोद के पॉल म्हणाले की, देशात २२ जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सोलापूर आणि बीड जिल्ह्यासह केरळ मधील ७ जिल्हे, मणिपूर मधील ५ जिल्हे, मेघालय ३ जिल्हे, अरुणाचल मधील ३ जिल्हे, आसाम मधील आणि त्रिपुरा जिल्ह्यातील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे.

दरम्यान या जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात या जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. विनाकारण प्रवास टाळणे, विनामास्क फिरणे, कंटेन्मेंट झोन तयार करणे यासारखी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा
Exit mobile version