Site icon सक्रिय न्यूज

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रुग्णालयात दाखल…….!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रुग्णालयात दाखल…….!

मुंबई दि.२८ – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयंत पाटील यांनी नुकताच पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. जयंत पाटील यांनी सांगली, कोल्हापूरमधील पूरस्थितीची पाहणी केली होती. अजित पवारांच्या दौऱ्यातही ते सोबत होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पूरनुकसानीची माहिती दिली होती.

दरम्यान, आज मंत्रिमंडळ बैठक सुरु असताना, जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे जयंत पाटील स्वत: बैठकीतून बाहेर चालत आले आणि ब्रीच कँडी रुग्णालयाकडे जाण्यासाठी निघाले. अस्वस्थ वाटू लागल्याने जयंत पाटील रुग्णालयात दाखल झाले आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयात जयंत पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे.

शेअर करा
Exit mobile version