Site icon सक्रिय न्यूज

गुंगीचे औषध देऊन निवृत्त शिक्षकाला लुबाडले, केज शहरातील घटना……! 

गुंगीचे औषध देऊन निवृत्त शिक्षकाला लुबाडले, केज शहरातील घटना……! 
 केज दि.२८ – एका सेवानिवृत्त शिक्षकास गुंगीचे व नशाकारक औषध खाण्यापिण्यातून देऊन हातातील दोन अंगठ्या व खिशातील दोन हजार रुपये काढून घेतल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
      केज तालुक्यातील टाकळी येथील निवृत्त शिक्षक त्रिंबक दादाराव घुले ( वय ६९ ) हे २० जुलै रोजी केज शहरात आले होते. ते दुपारी १ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरील वसुंधरा बँकेसमोर असताना आरोपी बंडू उर्फ माणिक सिरसट ( रा. आरणगाव ता. केज ) याने ओळख काढून त्यांना चहापाणी करीत खाण्यापिण्यातून गुंगीचे व नशाकारक औषध देऊन त्यांना उमरी रस्त्याने नेले. तिकडे ते बेशुद्ध झाल्यानंतर जवळपास कोणी नसल्याची संधी साधून सिरसट याने त्यांच्या हाताच्या बोटातील ५ ग्रामच्या दोन अंगठ्या व खिशातील २ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. २७ जुलै रोजी त्रिंबक घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडू उर्फ माणिक सिरसट याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
Exit mobile version